ग्रामविकास विभागाकडून नगर जिल्ह्यास मिळाल्या ४५ रुग्णवाहिका

0
6
Image credit goes to respective owners

अहमदनगर : ग्रामविकास विभागाकडून १४ व्या वित्त आयोग निधीतून ४५ रुग्णवाहिका जिल्हा परिषदेस कोविड-19 उपाययोजनेसाठी प्राप्त झाल्या. त्याचे हस्तांतरण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज येथील शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आले.

जिल्हा परीषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अहमदनगर महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे आदींची उपस्थिती होती.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ब्रेक दी चेन अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मोजक्या उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here