
अहमदनगर- सावेडी उपनगरातील मसद म्युच्युअल निधी लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापकासह संचालकाने एका दलालाच्या मध्यस्थीने बांधकाम व्यवसायिकाला आठ लाख 60 हजार रूपयांना गंडा घातला. 50 लाखाच्या कर्ज देण्याचे आमिष दाखवून ही फसवणू केली आहे.
याबाबत अशोक शंंकर चांदणे (रा. सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून व्यवस्थापक ज्ञानेश्वर धोंडीबा बर्वे, संचालक चाँदभाई ख्वाजा हुसेन शेख व त्याची पत्नी शबाना चाँदभाई शेख व दलाल मकरंद बोरूडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
चांदणे यांचा बांधकाम कर्ज घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी मकरंद बोरूडे याच्या मध्यस्थीने बर्वे, शेख यांची भेट घेतली. त्यांनी चांदणे यांना स्टेप अॅप सेल्फ कंट्रक्शन लोन या श्रेणीचे कर्ज स्कीम बाबत माहिती दिली. तसेच सदर स्कीम प्रमाणे 20 टक्के सेल्फ सिक्युरिटी डिपॉझिट आदा केल्यास त्वरीत कर्ज मंजुर करण्याचे आमिष दाखविले.
चांदणे यांनी 50 लाख रूपये कर्ज मंजुरीसाठी एकुण नऊ लाख 50 हजार रूपये सेल्फ सिक्युरिटी डिपॉझिट दिले. चांदणे यांना कर्ज आदा न केल्याने त्यांनी वेळोवेळी सेल्फ सिक्युरिटी डिपॉझिट ठेवलेल्या नऊ लाख 60 हजार रूपयांची मागणी केली. त्यांना वरील व्यक्तींनी 90 हजार रूपये परत दिले. मात्र अद्यापही आठ लाख 60 हजार रूपये न दिल्याने चांदणे यांची फसवणूक झाली आहे.