औरंगाबादच्या ६५ वर्षीय महिलेची तब्बल १८ वर्षांनंतर पाकीस्तानमधून सुटका

65-year-old woman from Aurangabad released from Pakistan after 18 years

0
39
65-year-old woman from Aurangabad released from Pakistan after 18 years
Image credit goes to respective owners

औरंगाबाद : औरंगाबाद येथील हसिना बेगम ह्या पाकिस्तानच्या जेल मध्ये गेल्या १८ वर्षापासून कैद होते त्यांची आता सुटका होऊन त्या परत भारतात परतल्या आहे. हसिना बेगम ह्या १८ वर्षांपूर्वी त्यांच्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेल्या होत्या परंतु पाकिस्तानमध्ये त्यांचे पासपोर्ट हरवल्याने त्यांना पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने त्यांना सिविलियन बंदी बनवून जेलमध्ये बंद केले व त्या पुन्हा भारतात परतू शकल्या नाही. या बाबत औरंगाबाद शहर पोलिसांनी विदेश मंत्रालयामार्फत सर्व प्रक्रिया राबवून हसिना बेगम यांना अमृतसर येथून परत आणले व त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले. औरंगाबाद शहर पोलिसांच्या वतीने पोलिस निरीक्षक संभाजी पवार साहेब यांनी हसिना बेगम यांचे रेल्वे स्टेशनवर स्वागत केले.

मी अनेक अडचनींचा सामना केला आणि आता मायदेशी परतल्यानंतर मला शांततेची जाणीव झाली आहे. मला वाटतेय की मी स्वर्गात आहे. मला पाकिस्तानमध्ये जबरदस्तीने कैद करण्यात आले होते असे. या सर्व प्रकरनात मी औरंगाबाद पोलिसांचे आभार मानते.” अशी प्रतिक्रिया हसिना बेगम यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here