एक्स्प्रेस मराठी | पुणे : पुण्यातील वडगाव (wadgaon) येथे विजेचा धक्का (electric shock) लागल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे सविस्तर वृत असे की सकाळी 11 वाजेच्या सुमारास मुलाने त्यांच्या घरातील पाण्याची मोटर चालू केली मोटर चालू केल्यानंतर मोटरीचा विद्युतप्रवाह लोखंडी जिन्यामध्ये उतरला व जिन्याला मुलाचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. सदर मुलगा मेमोरियल स्कूल आंबेगाव बुद्रुक येथे आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
(Web title : A 14-year-old boy died due to electric shock in Vadgaon, Pune)