वांजोळी येथील महिलेच्या फिर्यादीवरून आरोपींवर सोनई पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल

आरोपींवर सोनई पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल

0
28
express marathi

नेवासा दि. २८/०१/२०२१ : नेवासा तालुक्यातील वांजोळी परिसरात राहणार्‍या एका व्यक्तीच्या घरी जाऊन काही इसमांनी तुझा मुलगा कोठे आहे आम्हाला त्याचा बेट पहायचा आहे आहे असे म्हणून सदर व्यक्तीस त्यांनी मारहाण चालू केली हे भांडण सोडवण्यासाठी त्या व्यक्तीची सूनबाई आली असता आरोपींनी सदर तरुणीस  कवळी घालून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून त्या तरुणीचा विनयभंग केला व हात पिरगाळून लाथा-बुक्याने मारून जीवे मारण्याची धमकी ही दिली. या सर्व प्रकरणाबाबत सदर तरुणीने फिर्याद दिली असून तीन आरोपी विरोधात सोनई पोलिस (Sonai Police) स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here