
अहमदनगर- तिघांनी एका अल्पवयीन मुलीला गाडीत घालून श्रीगोंदा तालुक्यातील खाकीबा दर्गा येथे निले. तेथे तिच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केली. नगर तालुक्यातील एका पीडित अल्पवयीन मुलीने नगर तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीवरून दीपक शहादेव पवार, अमोल गोरख गायकवाड, राहुल बाळू वाघ (सर्व रा. हातवळण ता. नगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 15 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता दीपक, अमोल आणि राहुल यांनी फिर्यादी अल्पवयीन मुलीला बळजबरीने गाडीत बसून श्रीगोंदा तालुक्यातील खाकीबा दर्गा येथे नेले. तेथे दीपकने फिर्यादीसोबत बळजबरीने फोटो काढले. यानंतर ते फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करून बदनामी केली.
तसेच 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी फिर्यादी अल्पवयीन मुलगी मंदिरात गेली असता तिचा पाठलाग केला. तसेच 7 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता फिर्यादी घराच्या बाहेर पडवीत झोपलेली असताना वरील तिघांनी आमच्यासोबत येते का, असे म्हणून फिर्यादीला लज्जा उत्पन्न हाईल, असे वर्तन केले आहे.