Ahmednagar | Kopargaon Accident: कंटेनर व छोटा हत्ती यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना रविवार २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या अपघातात एका जणाचा मृत्यू.
कोपरगाव: नगर मनमाड महामार्गावर हॉटेल राजस्थान ढाबा येथे कंटेनर व छोटा हत्ती यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना रविवार २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या अपघातात एका जणाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी जखमी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर मनमाड महामार्गावर हॉटेल राजस्थान जवळ कंटेनर क्रमांक एन आय ए बी 01-9082 व पुण्याकडून धुळ्याकडे समान घेऊन जाणार छोटा हत्ती क्रमांक एम एच 12 पी क्यू 3876 यांच्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात झाल्याने छोटा हत्ती या गाडीचा चालक काशिनाथ गोते याचा जागेवरच मृत्यू झाला असून त्याच गाडीतील एक जण जखमी झाला आहे.
याबाबत तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळतात पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून यातील जखमीला कोपरगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मात्र कंटेनरचा चालक हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून पुढील तपास करत आहे.
Web Title: accident involving container and small elephant, one dead