नाशिक येथे जबरी चोरीतला मुद्देमाल विकत घेणारा आरोपी जेरबंद ! अहमदनगर पोलिसांची कारवाई

0
13
नाशिक येथे जबरी चोरीतला मुद्देमाल विकत घेणारा आरोपी जेरबंद ! अहमदनगर पोलिसांची कारवाई

अहमदनगर : दिनांक ११/११/२०२० रोजी संभाजी पाठक वय २३ राहणार घातशीरस ता. पाथर्डी हे शहापूर पेट्रोल पंपाजवळ त्यांची दुचाकी थांबवून लघुशंकेसाठी थांबले असता अज्ञात चोरट्याने त्यांचे डोक्यात मारहाण करून त्यांची Bajaj Platina, Vivo Y95 मोबाइल आणि ३०० रु. रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता.

सदर घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरचे पोनि. श्री अनिल कटके व त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी समांतर तपास करीत असताना पोनि. श्री अनिल कटके यांना गुप्त बातमीदारमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की सदर गुन्हा हा कोणी केला आहे आणि आरोपी हा नाशिक मध्ये लपला आहे. माहिती मिळाल्यानंतर पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी नाशिक येथे जाऊन आरोपी सोमनाथ रोकडे यास ताब्यात घेऊन चौकशी केले असतं त्याने चोरी केलेला मोबाइल समक्ष हजर केल्याने पोलिसांनी तो मोबाइल जप्त करून अधिक चौकशी केले असता आरोपी सोमनाथ रोकडे याने हा मोबाइल आरोपी  जॉन मडोची, साहिल म्हसके उर्फ मोन्या व हर्ष म्हसके उर्फ टोण्या यांचेकडून सदर मोबाइल विकत घेतला असल्याचे सांगितले.

सदर गुन्ह्यातील चोरी करणारे तीन ही आरोपी हे उपनगर पोलिस स्टेशन जिल्हा नाशिक येथे अन्य गुन्ह्यात सेंट्रल जेल नाशिक, येथे न्यायालयीन कोठडी मध्ये आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन करीत आहे.              

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here