
अहमदनगर- भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीस्वारास मागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. मृत दुचाकीस्वाराचे नाव समजू शकले नाही.
कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा फाटा ते झगडे फाटा पवार वस्ती जवळ हा अपघात झाला. पुणतांबा फाट्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकी स्वारास मागून जोराची धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून ते गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला.
ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. सदर घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.