
अहमदनगर- टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघा सख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे बुर्हाणनगर (ता. नगर) रस्त्यावर घडली.
प्रशांत भाऊसाहेब राऊत (वय २३) आणि रवी भाऊसाहेब राऊत (वय १९, दोघे रा. बुर्हाणनगर) अशी या दोघा मयत भावांची नावं आहेत. दोघे भाऊ छोटे व्यावसायिक असल्याचं समजतं.
आज पहाटे एक ते दीड वाजेच्या दरम्यान दोघा भावांना भरधाव वेगात जाणार्या टेम्पोची धडक बसली. अपघातानंतर या दोघांना येथील सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं. मात्र दोघेही मयत झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. याप्रकरणी भिंगार कँप पोलीस ठाण्यात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.