
अहमदनगर- दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द शिवारात लोणी- पिंपरी निर्मळ रस्त्यावर काल (शुक्रवार) रात्री ७.३० सुमारास हा अपघात झाला.
हॉटेल गारवा जवळच दोन दुचाकी समोर-समोर येऊन जोराने धडकल्या. त्यात दोघेही चालक गंभीर जखमी झाली. मात्र नंतर त्यांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही दुचाकींचे प्रचंड नुकसान झाले.
नितीन अशोक अहिरे (२०, रा.दत्तनगर, लोणी खुर्द) व सागर दत्तू पवार (१९, रा.कोल्हार भगवतीपुर) असे मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत.