
अहमदनगर- नगर -औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा फाटा (ता. नेवासा) येथे फॉर्च्युनर कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत युवकाचा मृत्यू झाला. संकेत लक्ष्मण पुंड (वय 19) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, संकेत हा आपल्या आत्याला सोडविण्यासाठी माळीचिंचोरा फाटा येथे आलेला होता. आत्याला सोडवून जात असतांना औरंगाबादहून – नगरकडे जाणार्या भरधाव वेगातील फॉर्च्युनर कारने दुचाकीवर असलेल्या संकेत पुंड याला जोराची धडक दिल्याने संकेत हा युवक या अपघातात जागीच ठार झाला.