
अहमदनगर- तब्बल 280 जणांंवर कर्जत पोलिसांनी अटक वॉरंट मोहिम राबवून कारवाई केली आहे. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर संबंधितांनी तारखांना हजर राहणे बंधनकारक असते. मात्र, अनेकांकडून या तारखांना दांडी मारली जाते. अशा आरोपीवर कर्जत पोलिसांनी कारवाई केली आहे. तारखा चुकवल्यावर काय होते? असा गैरसमज असलेल्या बेजबाबदारांना कायद्याचा चांगलाच धडा शिकवला आहे.
कर्जत पोलिसांनी न्यायालयीन तारखांना वेळोवेळी दांडी मारणार्या तब्बल 36 नागरीकांना 16 एप्रिलपासून अटक करून कर्जत, श्रीगोंदा, नगर, करमाळा, सासवड, माढा, इंदापूर, कागल, आष्टी आदी वेगवेगळ्या न्यायालयात हजर केले आहे.
पोलीस अटक करण्यासाठी गेल्यानंतर फरार होऊन 77 आरोपी परस्परच कोर्टात हजर झाले आहेत. जमानतीचे वॉरंट असलेल्या 167 लोकांनाही अटक करून त्यांना जामीन दिला आहे. एवढंच नव्हे तर अटक वॉरंट मधील पोटगीची रक्कम न देणार्या 7 जणांना वॉरंटमध्ये न्यायालयासमोर उभे करून पिडितांना पोटगीची रक्कम मिळवून दिली आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या टीमने अशा नागरिकांवर केलेली धरपकड अटक मोहीम कायद्याचे उल्लंघन करणार्यांना एकप्रकारे धाक बसवणारी आहे. 16 एप्रिलपासून न्यायालयात तारखांना हजर नसलेल्या तब्बल 36 जणांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले.जमानत वॉरंटमधील 167 लोकांना अटक करून जामीन देण्यात आला. कौटुंबिक वादातून विभक्त झालेल्या महिलांना न्यायालायकडून पोटगी मिळवून दिली जाते. मात्र सदरची पोटगी न्यायालयात जमा न करणार्या 7 जणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांनी पोटगीची रक्कम भरल्याने पीडित महिलांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्याची कामगिरी कर्जत पोलीसांनी केली आहे.