अहमदनगर- छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांना विजवाहक तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवार ता.8 ऑक्टोबर रोजी दुपारी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी परिसरातील वांदरकडा येथे ही घटना घडली आहे.
अनिकेत अरूण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे, विराज अजित बर्डे, अशी मृत्यू झालेल्या चारही मुलांचे नावे आहेत. या दुर्दैवी मृत्यूने पठारभागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शनिवारी दुपारी अनिकेत बर्डे, ओंकार बर्डे, दर्शन बर्डे, विराज बर्डे हे चौघे मुले खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेले होते. त्याच दरम्यान विजवाहक तारेचा शॉक लागून या चारीही लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या.घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी या चारीही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहे.
चारीही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने पठारभागासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर चारीही मुलांच्या दुर्देवी मृत्यूने अनेकांना अश्रु अनावर झाले होते. तर आई- वडीलांनी हंबारडा फोडला होता. पावसामुळे रस्ता खराब झाल्याने चारीही मुलांचे मृतदेह झोळीच्या माध्यमातून नागरिकांनी रुग्णवाहिकेपर्यंत नेले होते. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी विजवितरण कंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.