
अहमदनगर- सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकावण्याचा प्रकार श्रीरामपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित इन्स्टाग्राम युजरवर श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 10 ऑक्टोबर रोजी 10 वाजण्याच्या सुमारास मोहंमद रजा जाकीर, रा. काझीबाबारोड, वॉ. नं. 2, सुलताननगर यांचे इन्स्टाग्राम अकाउंट युजर नेम fq- lala786’ वर अर्शद अन्सार पिंजारी, रा. काझीबाबा रोड, वॉ.नं. 2, श्रीरामपूर याचे युजर नेम मळा-arshad.star-786’ या दोघांच्या इन्स्टाग्राम सोशल मीडिया साईटवर दि. 10 ऑक्टोबर रोजी सोशल मीडिया साईटवरील ‘mrperfect 51′ युजरनेम असलेल्या instagram.com/ वर अज्ञात व्यक्तीने त्याचे ‘http:/mrperfect51?igshid = Ym My MT-2M2Y’ वरून इन्स्टाग्राम अकाउंटवर 5 व्हिडीओ स्टोरेज प्रसारीत करून मुस्लिम धर्मियांच्या श्रद्धांचा अपमान करून त्यांची धार्मिक भावना भडकावणारे कृत्ये करून समाजाच्या वेगवेगळया वर्गामध्ये शत्रुत्वाची किंवा द्वेषाची भावना निर्माण केली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सादीक जैनुद्दीन शेख यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गु. र. नं. 933/2022 प्रमाणे ‘mrperfect51’ आयडीइस्टाग्रामवरील वापरणार्या इसमाविरोधात भादंवि कलम 295अ, 505 (2) प्रमाणे धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करत आहेत.