
अहमदनगर- अल्पवयीन मुलासह त्याच्या दाजीचे पाच ते सहा जणांनी स्कार्पिओ वाहनातून अपहरण केल्याची घटना सावेडी उपनगरात घडली.
याबाबत रंजना हिरामन गालफाडे (वय 40) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ज्ञानेश्वर हिरामन गालफाडे (वय 17) व बाळू चांदणे अशी अपहरण झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी विशाल कुंडलीक वडते (मुकादम, रा. देशपांडे प्रिंप्री ता. गेवराई, जि. बीड) व अनोळखी पाच ते सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांच्यासह त्यांची मुले, जावई ऊसतोड मजुरी काम करतात. त्यांनी वडते याच्याकडून उचल म्हणून काही रक्कम घेतली होती. ती फेडण्यासाठी दिवाळीनंतर कामावर जाण्याची बोली होती.
दरम्यान त्यापूर्वीच वडते व त्याच्या सहकार्यांनी फिर्यादीचा मुलगा ज्ञानेश्वर व जावई बाळू चांदणे यांचे अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.