
अहमदनगर- वृद्ध महिलेला कंटेनरने (जीके 19 बाय 2687) चिरडल्याने तिचा मृत्यू झाला. आश्रबाई भाऊराव केदार (वय 60, रा. हाराळ सैदापूर ता. पाथर्डी) असे मयत वृद्धेचे नाव आहे. रविवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथील महात्मा फुले चौकात भाजी मार्केट गेटवर हा अपघात झाला.
मयत आश्रबाई यांचा मुलगा अंबादास भाऊराव केदार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार कंटेनर चालक अमजद अब्दुल समद खान (रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी केदार यांची आई आश्रबाई व लताबाई डोंगरे (रा. मोहटा ता. पाथर्डी) या दोघी शनिवारी सकाळी पाथर्डी येथून नगर येथे फुले आणण्यासाठी आल्या होत्या. मार्केट यार्डजवळ कंटेनर चालकाने आश्रबाई यांना धडक दिली.
कंटेनरचे मागचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मयत घोषित केले. केदार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.