
अहमदनगर- अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यु झाल्याची घटना जामखेड तालुक्यातील राजेवाडी ते नन्नज रस्त्यावर घडली.अशोक मारुती कुमटकर (39, रा. राजेवाडी, ता. जामखेड) असे अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कुमटकर हे शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची मोटरसायकल (क्र. एम. एच. 16 बिडी 2347) हिचे वरून राजेवाडी ते नान्नज जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. तसेच वाहन चालक अपघाताची खबर न देता निघून गेला.
सुरज अशोक कुमटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज्ञात वाहनावरील चालकावर मृत्युस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी भोस हे अधिक तपास करत आहेत.