
अहमदनगर- बांधकाम व्यावसायिक राजेंद्र रामचंद्र पवार (रा. केडगाव) यांना फोनवरून धमकी दिल्या प्रकरणी नगरसेवक अमोल येवले यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये कलम 507 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केडगाव येथील बांधकाम व्यावसायिक पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यवसाय करत आहेत, केडगाव मध्ये बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर दरमहा एक लाख रुपये द्यावे लागेल जर तुम्ही हे पैसे दिले नाही तर महापालिकेच्या कोणत्याही बांधकाम परवाने व इतर सुविधा दिल्या जाणार नाहीत, अशी धमकी देऊन नगरसेवक येवले हा शिवीगाळ करून धमकावत आहेत, पोलीस प्रशासनाने कायदेशीर रित्या कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे बांधकाम व्यावसायिक पवार यांनी केली आहे.