
Ahmednagar News : एचडीएफसी बँकेच्या नगर शहरातील एका उपनगरातील शाखेचा मॅनेजर असलेल्या संदीप श्रिमल भळगट (रा. तारकपूर बस स्थानकाजवळ) याने महिला कर्मचार्यासोबत चावटपणा केल्याचा प्रकार समोर आला आहे.
त्या पीडित महिलेने त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भळगटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भळगट हा फिर्यादीला वारंवार टेक्स मॅसेज, व्हॉट्सअप मेसेज करून तसेच बॅकेच्या कॅबीनमध्ये बोलवून वारंवार शारिरीक सुखाची मागणी करत मानसिक त्रास देत होता.
मे, 2022 महिन्यातील घटना आहे. फिर्यादी या बँक कामासाठी मॅनेजर भळगट सोबत त्यांच्या दुचाकीवरून विनायकनगर येथे गेल्या होत्या. काम झाल्यानंतर ते दोघे बालिकाश्रम रोडने येत असताना फिर्यादी दुचाकी चालवित होत्या व भळगट हा पाठीमागे बसला होता.
त्यावेळी भळगटने फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्याच्या या कृत्यामुळे फिर्यादी त्याच्यावर रागावल्या व त्याला सोडून निघून गेल्या होत्या.
यासंदर्भात त्यांनी बँकेच्या सर्कल हेड ऑफिसकडे तक्रार केली होती. त्यांनी या तक्राराची दखल न घेतल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.