
अहमदनगर- हाॅटेलमध्ये दारूच्या बिलावरून तिघांनी चांगलाच राडा घातला. बुधवारी रात्री नागापूरच्या सिद्धेश्वरनगरमध्ये ही घटना घडली. हाॅटेल मॅनेजर सचिन तुकाराम बडे (वय 20, रा .सिद्धेश्वरनगर नागापुर) यांना शिवीगाळ, दमदाटी करत चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी मॅनेजर बडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बबलु गायकवाड, सॅन्डी गायकवाड, प्रमोद भाकरे (पुर्ण नाव माहित नाही रा. नागापुर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघा जणांनी ड्रींक केलेल्या बियरच्या बिलावरुन फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करुन चाकुचा धाक दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिली. हॉटेल समोर पटांगणात ऊभे असलेल्या स्वीफ्ट डिझायर गाडी (एमएच 15 एबी 6721) या गाडीवर दगड फेकुन मारुन तीची काच फोडुन नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार लोखंडे करीत आहेत.