
अहमदनगर- पोलीस ठाण्यासमोरील एका दुकानातच कोतवाली पोलिसांनी कारवाई करत तलवारी, चाकू, गुप्त्याचा मोठा शस्त्रसाठा पकडला. आज दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली. शस्त्र साठा ठेवणार्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर याची जाहिरात व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई केली गेली आहे.
पोलिसांनी 14 गुप्त्या, सहा तलवारी, सुरा, अशी शस्त्रे जप्त केली आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यासमोर आशा टॉकीज शेजारी अरिशा कलेक्शन नावाच्या दुकानात हा साठा आढळून आला. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पथकासह ही कारवाई केली आहे. अधिक तपास सुरू आहे.