अहमदनगर : टँकर-दुचाकीची धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले असल्याची घटना आज नगर-कल्याण महामार्गावरील बायपास चौकाजवळ घडली.
दत्तात्रय उत्तरेश्वर झळके आणि सुवर्णा दत्तात्रय झळके (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) अशी मयत पती-पत्नीची नावे आहेत.
कल्याण बायपास चौकाजवळ दुचाकीवरून जात असताना दाम्पत्य गाडीवरून पडून टँकरच्या मागच्या चाकाखाली सापडून अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दाम्पत्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.