
अहमदनगर- जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या जागी राकेश ओला यांची नियुक्ती झाली आहे. गृह विभागाने आज आदेश काढले आहेत. राज्यातील २४ पोलीस अधिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.
राकेश ओला यांनी यापूर्वी श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. सध्या ते नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे अधीक्षक होते. आता नगर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणुन त्यांना नियुक्ती मिळाली आहे.