
अहमदनगर- दुचाकीवरून प्रवास करणार्या कुटुंबाला टेम्पोने धडक दिली. या धडकेत सात वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला असून त्याचे वडिल जखमी झाले आहेत. कुणाल संतोष काळे असे मयत चिमुरड्याचे नाव आहे. संतोष काळे जखमी झाले आहेत. काळे कुटूंब नगर तालुक्यातील बहिरवाडी येथील आहे. नगर-औरंगाबाद रोडवरील शेंडी बायपास येथे दुपारी हा भीषण अपघात झाला आहे.
दरम्यान अपघातातनंतर संतप्त जमावाने नगर-औरंगाबाद रस्तावर आंदोलन केले. वाहतुकीची कोंडी झाली होती. एमआयडीसीचे निरीक्षक युवराज आठरे यांनी नागरिकांच्या भावना समजून घेतल्या. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
संतोष काळे हे कुटूंबासह दुचाकीवरून जात असताना औरंगाबादकडून नगरच्या दिशेने येणार्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात कुणाल ठार झाला तर संतोष जखमी झाले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.