
अहमदनगर- अहमदनगर-दौंड रोडवरील कायनेटीक चौकात डंपर-दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिला डॉक्टराचा मृत्यू झाला आहे. शिबोन अशोक टेंभेकर (वय 56 रा. अरणगाव ता. नगर) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे.
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खडीची वाहतूक करणार्या डंपरने टेंभेकर यांच्या दुचाकीला कायनेटीक चौकात धडक दिली. धडकेत दुचाकीचा चक्काचुर झाला. डंपरच्या पुढील चाकाखाली टेंभेकर यांची दुचाकी गेली.
अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी शिबोन टेंभेकर यांना उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल केले. दरम्यान उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघातानंतर पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला.