
अहमदनगर- लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला. तसेच अत्याचार करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाने तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यात घडली आहे.
या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सतिश उत्तम जाधव, रेणुका सतिश जाधव, रंजना उत्तम जाधव व स्वप्निल उत्तम जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसर संशयित सतिश जाधव व पीडित महिला हे दोघे पारनेर तालुक्यातील एका पेट्रोलपंपवार एकत्र काम करत आहेत. संशयित जाधव याने 2020 पासून ओळखीतून महिलेला लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केले. महिला गरोदर राहिल्यावर तीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले. यानंतर जाधव हा टाळू लागल्याने रविवारी (दि.18) पीडित महिला त्याच्या घरी गेली. येथे पिडीतेला संशयिताच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करत मारहाण केली.
सुपा पोलिसांनी सदर पीडित माहिलेच्या फिर्यादीवरुन सतिश उत्तम जाधवसह चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत. सतिश जाधव यास सुपा पोलिसांनी अटक केली असुन शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 27 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे पुढील तपास करत आहेत.