Akole Taluka Grampanchayat Election Result.
अकोले: अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. अकोले तालुक्यातील 41 ग्रामपंचायतच्या मतमोजणीला आज सकाळी तहसील कार्यालयात सुरुवात झाली. सुरुवातीला जाहीर झालेल्या निकालात अनेक ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या निवडणूकीत अपक्षांनी बाजी मारली आहे. तर खिरविरे, मुथाळणे या मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपने आपला झेंडा फडकविला आहे. तर मवेशीमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.
अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायत साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यातील जामगाव, शेलद, खुंटेवाडी, सावरकुटे या चार ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध झाल्या. उर्वरित 41 ग्रामपंचायत साठी काल रविवारी शांततेत मतदान पार पडले. आज सकाळी 10 वाजता अकोले तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. मुथाळणे ग्रामपंचायत च्या 10 पैकी 10 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
म्हाळुंगी ग्रामपंचायत निवडणूक सरपंचपदी भाजपाचे मदन निवृत्ती मेंगाळ विजयी झाले असून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विजय अस्वले यांचा पराभव केला आहे. विजयी उमेदवार जल्लोष करत आहेत. माजी आमदार वैभवराव पिचड व आमदार डॉ किरण लहामटे हे आपआपल्या संपर्क कार्यालयात उपस्थित आहेत. अधिकृत पक्षाचे सरपंच म्हणून विजयी झालेल्या उमेदवार रांचा पक्षांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. अनेक सरपंचपदाचे विजयी झालेले उमेदवार हे कोणत्या पक्षा कडून अधिकृतरित्या विजयी झाले हे सांगत नाहीत.काही जण अपक्ष असल्याचे स्पष्ट बोलत आहेत.
सरपंच पदाचे उमेदवार
म्हाळुंगी -: मदन निवृत्ती मेंगाळ. (भाजप)
धामानवण -: मनीषा पोपट चौधरी ( महाविकास )
मवेशी. -:. यमाजी भिवा भांगरे. ( महाविकस)
केळी रूम्हणवाडी -: मुरलीधर चीमा मेंगाळ (अपक्ष)
पडोशी -: दत्तु कुलाळ (अपक्ष)
तळे -:. हौशिराम धोंडीबा वेडे ( महाविकास )
तेरुंगण -: मच्छिंद्र देवराम कोकतरे ( अपक्ष )
खिरविरे -:. गणपत नामदेव डगळे. ( भाजप )
मुथाळणे -:. सुनंदा अविनाश गावंडे (भाजप)
कातळापुर -:. बाळू चाहादू ढगे. (महाविकास)
मालेगांव -:. चंद्रकांत तान्हाजी सुकटे (अपक्ष)
कोदनी. -:. चिमा सुनील बांबेरे (भाजप)
रणद बु -:. सुंदर हरी भोईर. (महाविकास)
करंडी. -:. ज्योती सुनील गोंदके (अपक्ष)
शिरपुंजे बु -:. कांताबाई भाऊ धिंदले. (महाविकास)
कोहोंडी -:. हिराबाई पांडुरंग तातळे. ( भाजप )
लव्हाळी ओतुर -: प्रकाश यमाजी लहामटे (महाविकास)
केलुंगण. -:. युवराज मुरलीधर देशमुख ( महाविकास)
राजूर ग्रामपंचायत
BREAKING NEWS
राजूर ग्रामपंचायत वर सरपंच पदी राष्ट्रवादीचे आमदार डॉ. लहामटे यांच्या गटाच्या निगळे बाई 19 मतांनी विजयी.
सदस्य वार्ड क्र.1
प्रमोद देशमुख महाविकास
अतुल पवार. भाजप
संगीता मैड भाजप
सदस्य वार्ड क्र.2
ओंकार नवाळी. महाविकास
संगिता मोहंडुळे महाविकास
संगीता जाधव. महाविकास
सदस्य वार्ड क्र.3
रामा मुतडक. महाविकास
रोहिणी देशमुख. . भाजप
सदस्य वार्ड क्र.4
गोकुळ कानकाटे. भाजप
सुप्रिया डगळे. भाजप
सारिका वालझाडे भाजप
सदस्य वार्ड क्र.5
राम बांगर. भाजप
कुसुम रावते. महाविकास
रोहिणी माळवे महाविकास
सदस्य वार्ड क्र.6
गणपत देशमुख भाजप
संतोष बनसोडे. भाजप
लता सोनवणे. महाविकास
इतर ग्रामपंचायत निकाल लवकरच ….
Web Title: Akole Taluka Grampanchayat Election Result