बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. प्रसारमाध्यमांशी बोलताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेले अमित शहा यांनी केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान केले. ते म्हणाले की, या आढावा बैठकीत लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक, विविध केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांचे महासंचालक, पोलिस आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीनंतर अमित शहा यांनी बारामुल्ला येथे एका सभेलाही संबोधित केले. या रॅलीत भाषण करताना त्यांनी जम्मू-काश्मीरमधील गुपकर गटावर जोरदार निशाणा साधला.