काय आहे अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना Annasaheb Patil Loan Scheme ?
महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil Loan Scheme) आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्रातील मराठा तरुणांना नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा सुरु असलेला व्यवसायाची वाढ करण्यासाठी रुपये १० लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) खालील योजना राबिवल्या जातात. हे कर्ज बिनव्याजी असणार असून प्रतीदिन रु. 10 प्रमाणे परतफेडीच्या अटीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाच्यावतीने अण्णासाहेब पाटील (Annasaheb Patil Loan Scheme) आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यातील बेरोजगारी बघता मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे,त्यांना व्यवसायामध्ये उभारी घेता यावी,व उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास व्हावा यासाठी आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना अत्यंत सोप्या पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास व्याज महामंडळ भरते. यामुळे युवकांना व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
Annasaheb Patil Loan आर्थिक विकास महामंडळामार्फत खालील योजना राबविल्या जातात
- वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
- गट कर्ज व्याज परतावा योजना
- गट प्रकल्प कर्ज योजना
Annasaheb Patil Loan योजनेचा लाभ कुणाला मिळणार ?
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील व्यक्तींना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले जाते तसेच लाभार्थ्याने कर्जाचे हफ्ते वेळेत भरल्यास त्या हफ्त्याच्या व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या साहाय्याने जमा करण्यात येते.
या योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी ४ टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो.
गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत १० लाख ते ५० लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते व कर्जाचा परतफेड कालावधी ५ वर्षासाठी निर्धारित केले गेलेला आहे.या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उमेदवारांच्या बचत गट,भागीदारी संस्था,सहकारी संस्था,कंपनी,LLP FPO अशा शासन प्रमाणित संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.
Annasaheb Patil Loan Eligibility (योजनेसाठी आवश्यक पात्रता) :
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा.
- लाभार्थी वयोगट मर्यादा पुरुषांसाठी ५० तर महिलांसाठी ५५ वर्ष एवढे असावे.
- लाभार्थीने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- दिव्यांगाकरिता, दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
- एका व्यक्तीला केवळ एका योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
- बँक खाते आधारकार्ड सोबत लिंक केलेले असावे.
- महामंडळाच्या ऑनलाईन वेबपोर्टलवर नाव नोंदणी केलेली असावी.
- लाभार्थी कोणत्याही बँकेचा/वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
Annasaheb Patil Loan Scheme Important Documents (योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे) :
- आधार कार्ड
- रेशनकार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाख पर्यंत आवश्यक)
- जातीचा दाखला
- प्रकल्प अहवाल
ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केल्यानंतर, प्रत्यक्ष बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे :
- आधार कार्ड
- मतदार कार्ड / पण कार्ड / वीज बिल
- उद्योग आधार / शॉप ऍक्ट लायसन्स
- बँक खाते / स्टेटमेंट
- सिबिल रिपोर्ट
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
- व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
बँकेतून कर्ज मंजूर झाल्यानंतर, व्याज परताव्यासाठी अर्जदाराने महामंडळास (ऑनलाईन) सादर करावयाची कागदपत्रे :
- बँक कर्ज मंजुरी पत्र
- लोन खाते बँक स्टेटमेंट
- उद्योग आधार / शॉप ऍक्ट लायसन्स
- व्यवसाय प्रकल्प अहवाल
- व्यवसायाचा फोटो
Annasaheb Patil Loan Scheme साठी ऑनलाइन अर्ज कश्या प्रकारे करावा ?
- सर्वप्रथम https://udyog.mahaswayam.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन नाव नोंदणी करावी लागते व त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक असते. अर्ज सादर केल्यानंतर लाभार्थास सशर्त ऑनलाईन हेतू पत्र (Letter of Intent) दिले जाते. या पत्राच्या आधारे लाभार्थीने बँकेकडे कर्ज मंजूर करून घ्यावे.
- अर्जदाराने महामंडळाच्या वेब पोर्टलवर नोंदणी करते वेळीस, आधारलिंक मोबाईलवर OTP द्वारे, मोबाईल ॲप द्वारे नोंदणी करावयाची असते. यासाठी सध्याचा वापरात असलेला मोबाईल नंबर, आधार क्रमांकासोबत अद्यावत (LINK) करावा, कारण नोंदणी करताना सदरचा OTP नमूद केल्याशिवाय नोंदणी प्रक्रीया पूर्ण होऊ शकत नाही.
- अर्जकर्त्याने अटी व शर्ती मंजूर असल्याबाबतचे शपथपत्र ऑनलाईन फॉरमॅटमध्ये भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत.
- लाभार्थ्याने व्यवसाय सुरु केलेनंतर सहा महिन्यामध्ये त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत.
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.
अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना अधिकृत शासन निर्णय PDF डाऊनलोड करा :
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती | Download |
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सुधारित योजना राबविणे बाबत (२१ नोव्हेंबर, २०१७) | Download |
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरीता अर्थसंकल्पित रु.50.00 कोटी निधीपैकी रु.30.00 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला. (१४ जानेवारी, २०२२ | Download |