उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशमधील इटावा येथील दिपेंद्र यादव हा विद्यार्थी अभ्यास करून त्याच्या मोटरसायकलवर घरी जात त्याला इटावा पोलिसांद्वारे रेग्युलर वाहन चेकिंगसाठी थांबवण्यात आले व दिपेंद्र याच्या मोटरसायकलच्या नंबरप्लेटवर एक नंबर पुसला गेला होता त्यामुळे त्याला पोलिसांनी पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला.
या सर्व घटनेनंतर दिपेंद्र याने ट्विटरवर इटावा शहराचे पोलिस अधीक्षक IPS आकाश तोमार यांना टॅग करून ट्विट मध्ये आपल्या चुकीबद्दल माफी मागितली व मी एक विद्यार्थी असून एवढी मोठी रक्कम भरण्यास असमर्थ आहे व माझी घरची परिस्थिति सुद्धा हलाकीची आहे असे सांगून त्याच्या चुकीबद्दल माफी मागितली. या ट्विटनंतर इटावा शहराचे पोलिस अधीक्षक IPS आकाश तोमार यांनी दिपेंद्र यांना ट्विट करून संगितले की तुमचा दंड माफ करण्यात आला आहे.