
अहमदनगर – चारचाकीने दुचाकीला कट मारल्याने दुचाकी डिव्हायडरला जाऊन धडकली. या धडकेत दुचाकीवरील युवक स्वप्निल अंबादास तोडमल (वय 20 रा. बहिरोबा मळा, इमामपूर ता. नगर) मयत झाला आहे. नगर-मनमाड रोडवरील सावेडी बस स्थानकाजवळ हा अपघात झाला.
या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबादास भाऊराव तोडमल (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा स्वप्निल तोडमल हा फोटो ग्राफीचा कामासाठी नगर येथे आला होता. तो दुचाकीवरून जात असताना त्याच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने कट मारला. यामुळे त्याची दुचाकी डिव्हायडरला जाऊन धडकली. या धडकेत स्वप्निल याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.