काय आहे आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat Yojna Yadi PDF Download) व यादी कुठे पहावी ?
आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojna) किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली.
प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्रणालीमध्ये हस्तक्षेप करणे, प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक अशा दोन्ही आरोग्यांना संरक्षण देणे, हेल्थकेअरला समग्रपणे संबोधित करण्यासाठी या योजनेचे उद्दीष्ट आहे. यामध्ये आरोग्य आणि निरोगीकरण केंद्रे आणि राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना या दोन प्रमुख आरोग्य उपक्रमांचा समावेश आहे. या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी ५ लाख रुपये इतकी रक्कम त्यांना त्यांच्या आरोग्य योजना मार्फत देण्यात येत असते.
आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat Yojna) यादी PDF डाऊनलोड कशा प्रकारे करावी ?
- तुमच्या मोबाइल / लॅपटॉप मध्ये क्रोम किंवा कोणतेही वेब ब्राउजर ओपन करा ( उदा. Google, Chrome, Firefox, Microsoft Edge)
- आता सर्च बार मध्ये खालील फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे “aapke dwar ayushman” टाइप करून सर्च करा. किंवा डायरेक्ट इथे क्लिक करा.

- आता सर्च रिझल्ट मध्ये दिसणार्या पहिल्या वेबसाइट वर क्लिक करा.

- वरील वेबसाइट वर क्लिक केल्यानंतर वेबसाइट मध्ये तुमचं मोबाइल नंबर टाका ज्याने करून तुम्हाला तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी बॉक्स मध्ये टाकून लॉगिन करा.

- लॉगीन केल्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका व गाव निवडून सर्च करायचे आहे.

- त्यानंतर तुमच्या गावाची आयुष्मान भारत योजना यादी pdf यादी तुम्हाला दिसेल ती तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल ती डाउनलोड करा.
अशा प्रकारे तुम्ही आयुष्मान भारत योजना यादी pdf डाऊनलोड करू शकता. तुम्हाला अजून काही शंका असल्यास खाली कॉमेंट करा व ही माहिती शेअर बटन वर क्लिक करून तुमच्या गावातील लोकांना शेअर करा 😊.