
अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणी आरोपी असलेला पत्रकार बाळ बोठे याला पसार काळात मदत करणारा जनार्दन अकुला चंद्रप्पा (रा. हैदराबाद) याच्या नावाने न्यायालयाने पकड वॉरंट जारी केले आहे, अशी माहिती अॅड. सचिन पटेकर यांनी दिली.
चंद्रप्पा व त्याचे वकील या प्रकरणाच्या सुनावणीस सतत गैरहजर राहात असल्याने न्यायालयाने हे वॉरंट काढले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 3 नोव्हेंबरला होणार आहे.
रेखा जरे खून खटल्यातील सर्व 12 आरोपींविरूध्द आरोप निश्चितीची प्रक्रिया प्रलंबित आहे. या खटल्याच्या सुनावणीस आरोपी वा त्यांचे वकीलही हजर राहात नसल्याने आरोप निश्चितीची प्रक्रिया लांबणीवर पडत चालली आहे. त्यामुळे न्यायालयाने चंद्रप्पाविरूध्द पकड वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले तसेच 3 नोव्हेंबरला सुनावणी निश्चित केली आहे.