ब्रेकिंग न्यूज : महाविद्यालये ‘या’ तारखेला उघडणार सामंत यांची घोषणा

Breaking News: minister Uday Samant announces that colleges will open on this date

0
60
expressmarathi

मुंबई : राज्यातील महाविद्यालये मागील नऊ – दहा महिन्यापासून कोरोना मुळे बंद आहे आता अकरावी – बारावी व पाचवी ते आठवीचे वर्ग देखील चालू करण्यात आले असून अद्यापही महाविद्यालये चालू झालेले नाही आहेत मागील एक महिन्यापासून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. उदय सामंत साहेब हे कधी याबबात घोषणा करतील याकडे पूर्ण विद्यार्थी व पालक वर्गाचे लक्ष्य लागले होते. याबबात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. उदय सामंत साहेब यांनी राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून उघडणार आहोत अशी माहिती दिली व यावेळेस ७५% उपस्थिती बंधनकारक नाही असेही त्यांनी सांगितले.

फक्त ५०% टक्के विद्यार्थी उपस्थिती असेल व विद्यार्थी ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे लेक्चर करू शकतात असे यावेळी त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना कोरोना रोखण्यासाठी केलेल्या नियमांचा पालन करावा लागेल तसेच जे विद्यार्थी कॉलेजला जाऊ शकत नाही ते ऑनलाइन लेक्चर करू शकतात असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एस-टी बस कधी चालू होते याकडे आता सर्व विद्यार्थी वर्गाचे लक्ष्य लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here