
अहमदनगर- नगर-औरंगाबाद रोडवरील खोसपुरी (ता. नगर) शिवारात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक बसून दशरथ नामदेव विधाटे (वय 77 रा. शिंगवे तुकाई ता. नेवासा) यांचा मृत्यू झाला.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत दशरथ यांचा मुलगा अशोक विधाटे यांनी फिर्याद दिली आहे.
दशरथ विधाते हे खोसपुरी शिवारातील हॉटेल निलकमलसमोर रस्ता ओलांडत होते. त्यादरम्यान त्यांना वाहनाची धडक बसली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दशरथ विधाटे यांचा मृत्यू झाला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.