Shrirampur Crime: इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून त्यावर तरुणीचे अश्लील छायाचित्रे व व्हिडीओ पोस्ट केल्या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल.
श्रीरामपूर: शहरातील एका व्यक्तीने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करून त्यावर तरुणीचे अश्लील छायाचित्रे व व्हिडीओ पोस्ट केल्या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तरुणीची बदनामी झाल्याने तिने एका मोबाइल क्रमांकावरून दोषी व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावरून सायबर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे याप्रकरणी तपास करत आहेत. फिर्यादी तरुणीच्या नावाने एका व्यक्तीने इन्स्टाग्रामवर अकाउंट तयार केले होते. त्यावर फिर्यादीचे छायाचित्र वापरले. अश्लील छायाचित्रे असलेला एक व्हिडीओ प्रसारित केला. बदनामी होऊन मनस्ताप झाल्याचे तरुणीने म्हटले आहे. आरोपीने एका व्हॉट्सअॅप क्रमांकावर छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरलची धमकी दिली. २६ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान हा प्रकार घडला. अखेर तरुणीने पोलिसांत तक्रार दिली.
Web Title: Crime Insane photos of a young woman were posted on a fake Instagram account