Sangamner Drowned Death: आठवीत शिकणारा मुलगा पाण्यात पोहोण्यासाठी गेला असता धरणातील पाण्याचा वाहता प्रवाह व पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी राजापूर धरणाच्या परिसरात इयत्ता आठवीत शिकणारा मुलगा पाण्यात पोहोण्यासाठी गेला असता धरणातील पाण्याचा वाहता प्रवाह व पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. हल्ली मुक्काम एमआयडीसी येथील नांदूर दुमाला येथील रहिवासी असणारा इयत्ता आठवीत शिकणारा साहिल संतोष कातोरे याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सदर मुलगा हा आई बरोबर दिवाळी सनाच्या पार्श्वभूमीवर कपडे धुण्यासाठी गेला असता नदीच्या पाण्यात पोहोण्यासाठी गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून युवकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदाशिव थोरात, उप सभापती नवनाथ अरगडे, उप सरपंच नरेंद्र गुंजाळ व स्थानिक तरुणांच्या मदतीने प्रयत्न करीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. सध्या म्हाळुंगी नदीला भरपूर पाणी सुरु आहे. नागरिकांनी धरणाजवळ जाताना काळजी घेण्याचे आवाहन उपसभापती नवनाथ अरगडे यांनी केले आहे.
Web Title: death of 13-year-old boy after drowned in Gunjalwadi Rajapur Dam