Ahmednagar: भाजपकडून निषेध, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा.
अहमदनगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर आक्षेपार्ह कॉमेंट केल्याचे समोर आले आहे. बदनामी केल्याप्रकरणी संदीप खामकर (रा. निंबोडी, ता. नगर) याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे स्वतंत्र फेसबुक पेज आहे. या पेजला अहमदनगर शहर भाजपचे ज्ञानेश्वर प्रभाकर काळे हेदेखील जॉइंट आहेत. या पेजवर संदीप खामकर याने केलेली आक्षेपार्ह कॉमेंट काळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबत शहराध्यक्ष महेंद्र गंधे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. भाजपाचे शहराध्यक्ष महेंद्र गंधे यांच्यासह उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, तुषार पोटे, समित बटुळे, संतोष गांधी, वसंत राठोड, आदींनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन खामकर याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Defamation of BJP state president Bawankule on social media