एक पहाट

कवी प्रशांत शिंदे

0
10
Express Marathi Poems

आज पुन्हा एक पहाट,

बालपणात रंगून गेली…

शाळेच्या त्या आठवणींत,

क्षणात गुंगवून गेली…

ते सगळ काही तिथे

अजुनही तसच होत…

फळ्यावरची ती मुळाक्षरे

कानात खूप काही सांगून गेली…

सगळ्या मित्रांची टोळी

आज माझ्या जवळ होती…

एवढ्याशा स्वप्नात ती

जरा जास्तच खेळून गेली…!

सर्व होते मोकळे

जे आता भेटत पण नाही…

पाखराच्या थव्यासारखी जी

आता दूर पांगून गेली…!

आज पुन्हा एक पहाट,

बालपणात रंगून गेली…!

कवी : प्रशांत शिंदे (Marathi Poems on Express Marathi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here