काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस भारत जोडो यात्रेने भारतीय राजकारणात बदल घडवून आणणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षात राजकीय गदारोळ सुरू आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नकारानंतर सातत्याने नवनवीन नावे समोर येत आहेत. मात्र, आता मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. या सगळ्यात काँग्रेसची भारत जोडो यात्रा भाजपशासित कर्नाटक राज्यात दाखल झाली आहे.