राहुरी येथील जबरी चोरी व दरोडे टाकणारा सराईत फरार आरोपी जेरबंद

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
32
राहुरी येथील जबरी चोरी व दरोडे टाकणारा सराईत फरार आरोपी जेरबंद

राहुरी : दिनांक २४/०२/२०२० रोजी रात्रीच्या वेळेस सराईत गुन्हेगार गौरव बाचकर (रा. नवीन गावठाण, बारागांव नांदूर ता. राहुरी) हा त्याच्या साथीदारांसोबत कोठेतरी दरोडा टाकणार आहे अशी गुप्त माहिती राहुरी पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना मिळाली होती. ह्या माहितीच्या आधारे कारवाई करून राहुरी पोलिस स्टेशन मध्ये भादवि कलम ३९९,४०२ प्रमाणे गौरव बाचकर व त्याच्या फरार साथीदारांविरोधात राहुरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी विशाल उर्फ गणेश शेटे हा राजुरी ता. राहता येथे येणार आहे. सदर आरोपीबाबत गुप्त माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून आरोपी विशाल उर्फ गणेश शेटे ह्यास ताब्यात घेऊन राहुरी पोलिस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे पुढील कारवाई राहुरी पोलिस स्टेशन करीत आहे. सदर आरोपीवर यापूर्वी वेगवेगळ्या पोलिस स्टेशन मध्ये एकूण १५ गुन्हे दाखल आहेत.          

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here