गुजरात निवडणूक 2022: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मंगळवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत महत्त्वाची माहिती दिली. गांधीनगरमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, गुजरातमध्ये सुमारे 4.83 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. ते म्हणाले की, 182 विधानसभा मतदारसंघात 51,782 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.