बर्ड फ्लू (bird flu in Ahmednagar) मुळे नगर जिल्ह्यामध्ये ५० कोंबड्यांचा मृत्यू ?

0
53
bird flu in ahmednagar

अहमदनगर : आधीच कोरोनाचे संकट चालू असताना बर्ड फ्लू (bird flu) ने त्यात उडी मारली आहे. परभणी जिल्ह्यात जवळपास ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लू (bird flu) मुळे मृत्यू झाला आहे. हे संकट असतानाच नगर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फार्मवर ५० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे आता या बर्ड फ्लू (bird flu) चे अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.   

सविस्तर वृत्त असे के नगर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फार्मवर ५० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू नेमके कशामुळे झाला यासाठी त्या मृत कोंबड्यांचे नमुने घेण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत नगर जिल्ह्यात जवळपास ३ हजार ३४१ पोल्ट्री फार्म्स आहेत त्यामध्ये जवळपास १ कोटी १४ लाख कोंबड्या आहेत त्यातीलच एका पोल्ट्री फार्ममध्ये या ५० कोंबड्यांच्या मृत्युची नोंद करण्यात आली आहे.   

या कोंबड्यांच्या मृत्यूबाबत त्या मृत कोंबड्यांचे नमुने घेण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत. जिल्ह्यात बर्ड फ्लू (bird flu) चा प्रसार होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत कार्यवाही सुरू आहे. पोल्ट्री फार्मच्या मालकांना किंवा चालकांना काही माहिती द्यायची असल्यास त्यांनी तत्काल पशुसंवर्धन विभागाला संपर्क साधावा. सतर्कते साठी जिल्ह्यात ७८ पथकांची स्थापना करण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी IAS राजेंद्र भोसले म्हणाले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here