
अहमदनगर- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात काल गुरूवारी झालेल्या कांदा लिलावात 27 हजार 520 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावरान कांदा 2005 ते 2 हजार 500 रूपये, दोन नंबरचा कांदा 1505 ते 2 हजार रूपये तर तिन नंबरचा कांदा 200 ते 1 हजार 500 रूपये भावाने विकला गेला.
तसेच गोल्टी कांद्याला 1100 ते 1600 रूपये भाव मिळाला. अपवादात्मक 90 कांदा गोण्यांना 3 हजार रूपये, 9 कांदा गोण्यांना 2 हजार 900 रूपये, 52 कांदा गोण्यांना 2 हजार 800 रूपये, 90 कांदा गोण्यांना 2 हजार 700 रूपये तर 81 कांदा गोण्यांना 2 हजार 600 रूपये भाव मिळाला.