रेशीम लाभार्थी नोंदी साठी नगर जिल्हयात महारेशीम अभियानास जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या हस्ते प्रारंभ

0
60
express marathi
Image credits goes to respective owners

अहमदनगर : रेशीम संचालनालय नागपूर अंर्तगत जिल्हा रेशीम कार्यालय अहमदनगर मार्फत सन २०२१-२२ मध्ये रेशीम शेतीसाठी लाभार्थी निवड करण्यासाठी महा-रेशीम अभियान २०२१ ची सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले यांचे हस्ते महा रेशीम अभियानाचे रेशीम रथास हिरवा झेंडा दाखवून महा-रेशीम अभियान २०२१ उद्‌घाटन करण्यात आले.

अभियानाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचीत, रोहयो उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा नियोजन अधिकाती निलेश भदाणे, रेशीम विकास अधिकारी बी डी.डेगळे, प्रकल्प अधिकारी पी.व्ही.इंगळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बागायत क्षेत्र असलेल्या निवडक गावांच्या समुहामध्ये रेशीम शेतीस मोठया प्रमाणावर वाव असल्याने शेतकऱ्यांनी अभियान कालावधीमध्ये रेशीम शेती करण्यासाठी नोंदणी करून मोठया संखेने सहभागी करून घेण्यासाठी सुचित केले. वातावरण बदलामुळे पारंपारीक शेतीमधुन शेतकऱ्यांना निश्चीसत व शाश्वत उत्पन्न मिळणे दिवसेदिवस जिकिरीचे होत चालले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हमखास शाश्वत उत्पन्नाची हमी असलेल्या रेशीम शेतीकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले.

तुती पिकास शासनाने कृषि पिक म्हणुन घोषित केल्यामुळे इतर पिकाप्रमाणेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दूप्पट करणेसाठी रेशीम शेती उपयुक्त ठरणार असल्याचे श्री. जगताप यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक योजनेमधुन रेशीम विकासच्या योजनांना अनुदान देण्यात येत असल्याचे श्री. भदाणे यांनी सागितले.

जिल्हयात रेशीम शेतीसाठी असणाऱ्या विविध योजनांचे माध्यमातून लाभार्थी निवड करण्यासाठी हे महारेशीम अभियान २०२१ राबविण्यात येत आहे. रेशीम शेतीमध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, पितळे कॉलनी, महागणपती मंदिराजवळ, नगर -मनमाड रोड नागापूर, अहमदनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here