लम्पी रोग नुकसान भरपाई (Lumpy virus nuksan bharpai) साठी सरकार द्वारे 10.23 कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यात आला असून ही नुकसान भरपाई कुणाला व कश्याप्रकारे मिळणार आहे. याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळेल. तुमचे देखील जनावर लम्पी रोगामुळे दगावले असेल तर तुम्हाला देखील शासनाच्या या नुकसानभरपाईचा लाभ मिळू शकतो.
काय आहे लम्पी रोग (What is Lumpy Virus) ?

लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. माश्या आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो. यामुळे ताप येणे, त्वचेवर गाठी येणे अशी लक्षणे दिसून प्राण्याचा मृत्यू देखील होऊ शकतो.
कोणाला मिळणार नुकसान भरपाई (lumpy virus nuksan bharpai)
- असे शेतकरी ज्यांच्याकडे दुधाळ जनावरे आहेत व जर ही जनावरे लम्पी रोगाने (lumpy virus) प्रभावित झाली असेल तर अशा शेतकर्यांना 30 हजार रुपये प्रती जनावर या प्रमाणे 90 हजार रुपयां पर्यंत मदत मिळेल.
- ज्या शेतकर्यांची बैल लम्पी रोगाने (lumpy virus nuksan bharpai) प्रभावित झाली आहे अश्या शेतकर्यांना 25 हजार रुपये प्रती जनावर या प्रमाणे 75 हजार रुपयां पर्यंत मदत मिळेल.
- ज्या शेतकर्यांची वासरे म्हणजेच लहान जनावरे लम्पी रोगाने प्रभावित झाली आहे अश्या शेतकर्यांना 16 हजार रुपये प्रती जनावर या प्रमाणे 48 हजार रुपयां पर्यंत मदत मिळेल.
[ आवश्यक सुचना : शेतकऱ्यांकडील केवळ तीनच जनावरांना याचा लाभ मिळणार आहे व ही मदत फक्त लम्पी रोगाने मृत्यू झालेल्या जनावरांसाठी आहे ]