महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत येणार्या (magel tyala vihir yojna) सिंचन विहरींची कामे भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 विहीरी खोदणे शक्य आहे. सरकार कडून या विहिरी खोद्ण्यासाठी 4 लाख अनुदान देखील मिळणार आहे परंतु हे अनुदान कुणाला मिळणार तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही ही सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.
काय आहे मागेल त्याला विहीर योजना ? magel tyala vihir yojna
नोव्हेंबर 2021 मध्ये नीती आयोगाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या बहु-आयामी गरीबी निर्देशांक म्हणजेच Multi-Dimensional Poverty Index च्या रिपोर्ट प्रमाणे महाराष्ट्रात 14.9 टक्के कुटुंब दारिद्र्यरेषेखाली आहेत व केरळमध्ये फक्त 0.71 टक्के कुटुंब दारिद्र्यरेषेखाली आहेत याचा अर्थ असा की भारतातील राज्यांना दारिद्र्य संपवणे शक्य आहे. आता हे सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा जनक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा कायदा भारत सरकारने त्या आधारवरच केला आहे. मनरेगा ही फक्त रोजगार देणारी योजना नसून विकासात भर घालणारी योजना आहे.
मागील काही काळापासून महाराष्ट्र राज्याने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपति करण्याचे ठरविले आहे. भूजलाच्या सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजून 3,87,500 विहीरी खोदणे शक्य आहे. मनरेगा अंतर्गत या विहिरी लवकरात लवकर खोदल्या गेल्यास आणि त्यातून उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर केला गेल्यास मोठ्या संख्येने कुटुंबे लखपती होतील व पर्यायाने महाराष्ट्र राज्य दारिद्रि कमी करण्याबाबत केरळ सोबत वाटचाल करेल. आता महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्यासाठी सरकार ने आता मनरेगा अंतर्गत विहीरींचे कामे लवकर पूर्ण करण्याचे ठरविले आहे आधी विहीर खोदन्यासाठी 3 लाख अनुदान मिळत असे पण आता ही मर्यादा वाढवून 4 लाख करण्यात आली आहे.
कोणाला मिळणार या योजनेचा लाभ (magel tyala vihir yojna)
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- निरधिसूचित जमाती (भटक्या जमाती)
- दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
- स्त्री कर्ता असलेली कुटुंब
- शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेली व्यक्ति कर्ता असलेली कुटुंबे
- जामीन सुधारणांचे लाभार्थी
- इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी
- अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006 (2007 चा 2) खालील लाभार्थी
- सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत भूधारणा)
- अल्प भुधारक (5 एकर पर्यंत भूधारणा)
लाभार्थी पात्रता (magel tyala vihir yojna)
- लाभार्थ्यांकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
- ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणपासून ५०० मीटर विहीर नसावी.
- दोन सिंचन विहिरीमधील १५० मीटर अंतरासाठी खालील अटी लागू करण्यात आलेल्या आहेत.
- दोन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही.
- लाभार्थीच्या सातबारावर अगोरच विहीर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- लाभार्थीकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असावा.
- लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेवू शकतात मात्र त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र ०.४० पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- 7 12 ऑनलाइन उतारा
- 8 अ ऑनलाइन उतारा
- जॉबकार्ड ची प्रत
- सामूहिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा.
- सामूहिक विहीर असल्यास सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र.
अर्ज कसा करावा ?
इच्छुक (magel tyala vihir yojna) लाभार्थ्याने विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ अर्जाचा नमूना व ब – संमती पत्र सोबत जोडलेले) ऑनलाइन किंवा ग्रामपंचायतीच्या अर्ज पेटीत टाकावे. ऑनलाइन व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्याने शक्यतोवर ऑनलाइन अर्ज करावा .