काय आहे महामेश मेंढी पालन योजना ? mahamesh yojna 2022
मित्रांनो आपल्या राज्यातील भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील 18 ते 60 वयोगटातील अर्जदारांना मेंढी पालन करण्यासाठी अंतर्गत 75 टक्के अनुदानावर 20 मेंढ्या व एक 1 मेंढा गट वाटप करणारी महत्त्वपूर्ण अशी योजना (mahamesh mendhi palan yojna) महाराष्ट्र शासनाच्या राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अंतर्गत राबविण्यात येत आहे. (mahamesh yojna 2022) अर्जदारांकडुन दि. 15/11/2022 ते 30/11/1022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल त्यांना 75 टक्के अनुदानावर मेंढ्यांचा गट वाटप करण्यात येईल.
mahamesh yojna 2022 योजनेचे वैशिष्ट्ये
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर वीस मेंढ्या एक नर मेंढा यांचा गट वाटप करण्यात येणार आहे.
- मेंढी पालन करिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान आहे.
- मेंढी पालनसाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान
- हिरव्या चाऱ्याला मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper ) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान.
- पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान.

mahamesh yojna 2022 पात्रता कोण अर्ज करू शकतो ?
- सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल.
- या योजनेअंतर्गत अर्ज करणारा तसेच लाभ मिळवणाऱ्या लाभार्थ्याचे वय हे 18 ते 60 या दरम्यान असावे.
- या योजनेअंतर्गत महिलांकरिता 30 टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले असून अपंगांना तीन टक्के आरक्षण राखीव आहे.
- या योजने mahamesh yojna 2022 अंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील बचत गट व पशुपालक उत्पादक कंपन्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
- अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतीनिधी नसावा.
अर्ज करण्याची तारीख
अर्जदारांकडुन दि. 15/11/2022 ते 30/11/1022 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
mahamesh yojna अर्ज कश्याप्रकारे करावा ?
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आवश्यक कागदपत्रे
mahamesh mendhi palan yojna तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करायची नसून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जर तुमची या योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या लॉटरीमध्ये निवड झाली तर तुम्हाला कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतील