अहमदनगर- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी जास्तीत जास्त 2500 रुपयांपर्यंत निघाले.एक-दोन लॉटला 2200 ते 2500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
कांद्याची 88 हजार 370 गोण्या आवक झाली. मोठा कलरपत्ती कांद्याला 2000 ते 2100 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1700 ते 1800 रुपये, गोल्टा कांद्याला 1200 ते 1500 रुपये, गोल्टी कांद्याला 1000 ते 1200 रुपये, जोड कांद्याला 400 ते 500 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला.